Thursday, April 24, 2014

ProBiotic : Science behind the food culture


                            FOOD TRADITION IN INDIA
PROBIOTIC
  India has a wide range of culture, language, costumes and food. Every state in India has a unique identity in the form of literature, music as well as taste. Various experiments have proved that the Indian food culture has a scientific base structure. Fermented foodstuff is an important type of Indian food culture. Bacteria plays vital role in the fermentation process in Indian traditional food. ‘Anarse’, ‘Appe’ in Maharashtra, ‘Dosa’, ‘Idli’ in southern India and universally accepted Indian food like Curd, Buttermilk, Lassi are some of the classic examples of Indian traditional fermented food.
                                Human body contains a variety of bacteria, some of them cause disease and are known as ‘Pathogen’. On the other hand, some have the capability to colonies in our intestine and enhance resistance of our body against pathogenic diseases. Such bacteria prohibit colonization of pathogens e.g. Salmonella, Vibrio etc. in intestine. These good, beneficial bacteria are known as Probiotics. Though the concept of probiotics has recently showed its existence, it has its roots somewhere in the past. For example, blessing a family member with curd and sugar before the person leaves home for travelling was one of the rituals followed by Indians has a scientific approach. Lactobacilli bacteria play a crucial role in the fermentation process of curd which prohibits pathogen to colonize into our system and helps in increasing the resistance power of the human body.           
                       Indian traditional fermented food can be classified into two types. One type of a fermented food is made up of milk in which the process of steaming is not included. And the other is known as steamed fermented food. India is the only country to produce steamed fermented food products. Most of the bacteria’s get damaged in the steaming process. Professor Dr. Sham Diwanay and Professor Rajan Walhe, the faculty members of Pune’s well known Abasaheb Garware College have proven that the bacteria that can survive in the steaming process helps human body to overcome various diseases and acts as a probiotics.
            In Europe, in the ancient times, the intestines of the sacrificed animals were cleaned and used to store milk. These intestines were hanged from the roof and were moved occasionally by the residents. People drank this milk and are known to live over hundred years. This was the source of inspiration for Dr. Diwanay to start his experiments.
            Recently the duo is conducting an experiment on Indian traditional food specially South Indian dishes idli and dosa. They have isolated bacteria from these food items. A series of tests are used to answer questions like:  are these bacteria probiotics? What is the level of acid tolerance, bile salt tolerance and temperature tolerance of these and do these bacteria cause disease or not?  Haemolysis test is being used as a tool of experiment. The results have shown the high amount of probiotic bacteria is present in the steamed preparations. These bacteria prohibit growth and multiplication of pathogenic bacteria like Salmonella Vibrio in laboratory conditions. Professor Diwanay isolated and identified number of bacteria with probiotic potential. Some of these inhibit the growth of Candida albicans (a pathogenic yeast) which causes oral as well as vaginal infections. Probiotics are not curative but a preventive measure. Also under his guidance Mr. Harshwardhan  Jadhav, a M. Sc. Microbiology student prepared an innovative product “Probiotic Chocolate”. This work is appreciated and honored at National level conferences. Even doctors compulsorily prescribe probiotic medicines as a supplement to antibiotic therapy. Antibiotics hamper the growth of beneficial bacteria in our body. Hence, traditionally fermented food is the key to make our life healthier and happier.

Tuesday, April 1, 2014

दिल्लीत मराठी पताका उंचविणारे – महाराष्ट्र परिचय केंन्द्र



दिल्लीत मराठी पताका उंचविणारे – महाराष्ट्र परिचय केंद्र
दिल्ली, देशाची राजधानी. राष्ट्रीय पातळीवरील घडामोडींचे मध्यवर्ती केंन्द्र. विविधतेने नटलेल्या या देशात प्रत्येक राज्याची संस्कृती मग ती पोशाख – आहार – विहार – सामाजिक असो. ती वेगळी आहे. देशातील 28 राज्यांच्या संस्कृतीचे दर्शन दिल्लीत पहायला मिळते. दिल्ली हे विविध घडामोडींचे केंन्द्र असल्याने तेथील प्रत्येक माहिती अधिकृतरित्या महाराष्ट्रातील माणसांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे. दिल्लीमध्ये मराठी माणसांची संख्या तशी भरपूर आहे. दिल्लीतील घडामोडींची अधिकृत माहिती मिळण्याचे, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील संस्कृतीचे, साहित्याचे, सामाजिक बदलांचे राजधानीत प्रतिनिधीत्व करणारे केंन्द्र म्हणजे महाराष्ट्र परिचय केंन्द्र...
दिल्ली अभ्यास सहलीमध्ये राजधानीतील प्रख्यात मराठी पत्रकार अनंत बागाईतकर यांना भेटण्याची संधी मिळाली. ही भेट महाराष्ट्र परिचय केन्द्रामध्ये झाली. या निमित्ताने महाराष्ट्र परिचय केन्द्र पाहण्याची संधी मिळाली.  प्रशस्त असा केन्द्राच्या आफीस मधील हाल मध्ये ही भेट होणार होती. हालमध्ये चारी बाजूला मराठी पुस्तकांचा खच दिसत होता. टेबलवरील ठेवलेली महाराष्ट्रातील मराठी वर्तमानपत्रे दिल्लीत गेल्यानंतर प्रथमच डोळ्यासमोर दिसत होती. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या भेटीने महाराष्ट्राबाबत उत्साह निर्माण करण्याचे काम केलं.
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या दूरदृष्टीतून या केंन्द्राची सुरूवात झाली. दिल्लीमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व व प्रतिबिंब असावे, हा त्यामागचा उद्देश होता. आज 52 वर्षांनंतर या केन्द्रांने ध्येय जोपासतानाच विविध उपक्रमांच्या माध्यमांतून दिल्लीतील मराठी माणसासाठी महाराष्ट्र दिल्लीत उभा केला आहे. मराठी साहित्य आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजत असताना महाराष्ट्रयीन दिल्लीकरांना त्यांच्या मातीच्या साहित्याशी नाळ अबाधित राखता यावी, यासाठी दरवर्षी ग्रंथोत्सव भरविण्यात येतो. त्याच धर्तीवर चित्रपट महोत्सवाचे देखील आयोजन करण्यात येते.
आज महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करणारे 73 खासदार दिल्लीत आहेत. महाराष्ट्रातून दिल्लीत गेलेल्या मराठी माणसाला स्थिर होण्यास व खासदारांशी समन्वय साधण्यासाठी येथून मदत मिळते. महाराष्ट्र शासनासाठी राजधानीतील घडामोडींच्या अघिकृत माहितीचे केंन्द्र म्हणून याकडे पाहिले जाते.
उत्तराखंडमध्ये आपत्तीजनक परिस्थितीमध्ये अनेक महाराष्ट्रीयन अडकले होते. मुंबईतून मदत पोहण्यास होणारा उशीर लक्षात घेता, महाराष्ट्र परिचय केन्द्रांने या ठिकाणी महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व केले. बचावलेल्या लोकांची राहण्याची व्यवस्था, त्यांना परत महाराष्ट्रात पाठविण्यासाठी केन्द्रांतील कर्मचारी 24 तास करत होते. केन्द्रांचे उपसंचालक दयानंद कांबळे, जनसंपर्क अधिकारी प्रविण डाके व उपसंपादक रितेश भोई यांनी आमच्याशी मुक्तसंवाद साधला.
केन्द्रांतून बाहेर पडताना एवढेच वाटते, मराठी मामसाला दिल्लीत गेल्यानंतर काहीही अडचण आली तर हक्काने मदत मागावी व त्याचप्रमाणे मदत करणारे ठिकाण म्हणजे महाराष्ट्र परिचय केन्द्रं.विशेषत: पत्रकारांसाठी....

लोकशाही मंदिराच्या सहवासात.................



लोकशाही मंदिराच्या सहवासात.................

फत्तेपूर सिक्रीचा लाल दगड वापरल्याने जिचे सौंदर्य उठून दिसत आहे...जिला 12 असे भव्य दरवाजे आहेत....1140 व्यासाची भव्य इमारत... प्रत्येक भारतीयाचे या वास्तूला वास्तवात पाहणे हे स्वप्नच असते. रानडे मध्ये आल्यापासून व दिल्ली टूर असा काही प्रकार असतो, हे कळाल्यापासून मी देखील ती वास्तू पाहण्याचे स्वप्न पाहत होतो. ही वास्तू एखादे धर्मिक मंदिर नाही वा राजवाडा . ती आहे भारताची संसद. जिथून या लोकशाही प्रधान देशाचा राज्यकारभार चालतो तर कधी कधी इथंच त्या लोकशाहीचा बाजार देखील भरतो. दिल्ली टूर च्या निमित्ताने संसद पाहण्याची संधी मिळाली.
संसद..जगातील सर्वांत मोठ्या लोकशाही शासन पद्धतीचे मुख्य केंन्द्र. भारतीय संसद म्हणजे प्रत्येक भारतीयांसाठी व लोकशाहीच्या अनुयांयासाठी मंदिरच... ज्या मंदिरात फक्त संविधान हा एकमेव धर्म पाळला जातो तर या धर्मात स्वातंत्र्य समता बंधूता व सर्वांना न्याय ही चार वर्ण पाळली जातात.
आंबेडकर, गांधी, शिवाजी व \w$boo देशात समानता एकात्मता यांचे पुतळे या वास्तू बाहेर उभे आहेत. जणू ते या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक लोकप्रतिनिधींना लोकशाही संवर्धन व संरक्षणाची जाण करून देत असतील. लाल दगडातील या वास्तूचे प्रत्येक कोपऱ्यातील रूप मनात साठवण्यासाठीच असल्याची जाणीव संसद भवन पाहताना होते.
लोकसभा राज्यसभा हे संसदेतील दोन मुख्य हाल. दूरदर्शनच्या माध्यमातून दिसणाऱ्या या ठिकाणी आपण आहोत यावर आपला विश्वासच बसत नाही. सभागृहांची रचना, त्यांचा पुस्तकांमधून वाचलेला इतिहास आठवायला लागतो. हीच ती ठिकाणे जी देशाच्या भवितव्याबाबत मागील 60 वर्षांपासून झालेल्या चर्चा व वादाची साक्षीदार आहेत. हे सभागृह पाहताना 50 वर्ष मागे जाणारे विचार मी थांबवू शकत नव्हतो.
संसदेतील मुख्य आकर्षण म्हणजे सेंट्रल हाल, याच ठिकाणी वसाहतवादी ब्रिटीशांकडून 1947 ला भारताला सार्वभौमत्व मिळाले. सत्तेचे हस्तांतरण ज्या हाल मध्ये झाले तो हा 196 फूट व्यासाचा हाल आंतरराष्ट्रीय पातळीवरील सर्वोच्च बांधकामाचा नमुना म्हणून पाहिला जातो. इथं उभं असताना देशाचा इतिहास अभिमानाने डोळ्यासमोर उभा राहतो. या हालच्या दगडांनी राज्यघटना देशाला स्वाधीन करतानाचे क्षण अनुभवले असतील. आंबेडकरांनी याच ठिकाणाहून ते प्रसिद्ध राज्यघटनेवरील भाषण केले होते. लोकशाही प्रदान राष्ट्र म्हणून उदयाला येताना संविधानाचा गैरवापर कसा देशाला विघातक ठरू शकतो, हे सांगणारे ते भाषण आजही हे सभागृह आठवत असेल का ?
या इमारतीनं 1947 पासून आजतागायतचा देशाचा विकास पाहिला असेल व त्यावरील चिंतन ऐकले असेल. इथंच लोकशाहीची जोपासना झाली. 67 वर्षांच्या इतिहासात अनेक हल्ले पचवत लोकशाही स्थिर राहिल्याची संसद साक्षीदार आहे. वैचारिक, शाब्दिक हल्ले सहन करणाऱ्या या संसद भवनाने 2001 मध्ये गोळ्यांचा वर्षाव सहन केला. लाल दगडांनी बांधलेल्या भिंतीच्या सौंदर्यांवर गोळ्यांनी निर्माण केलेली छिद्रं हल्ल्याची आठवण करून देतात. तरी आज देखील ती तेवढ्याच खंबीरपणे देशातील अर्थिक, सामाजिक व राजकिय अरिष्ठांना तोंड देत लोकशाहीला जोपासण्यासाठी सक्षमपणे उभी आहे.
अभिमानाचे आनंदाचे क्षण माझ्या आठवणीत, विचारात पेरणारी ही वास्तू, तिचा तो राजेशाही थाट आयुष्यभरासाठी मनात आठवणीचे घर करून राहिल. भविष्यात चर्चेत, वर्तमानपत्र, टि.व्ही च्या माध्यमातून संसद भवन दिसले तरी दिल्ली सहलीच्या निमित्ताने दोन- अडीच तास न्याहाललेले संसद भवनाचे मनात साठवलेले चिरंतन सौंदर्य डोळ्यासमोर उभे राहिल....

Friday, March 21, 2014

सरकारी धोरण नक्षलवाद्यांच्या खांद्यावरून....



सरकारी धोरण नक्षलवाद्यांच्या खांद्यावरून....
                     
                    लिखाणास सुरूवात करण्यापूर्वी एक गोष्ट प्रकर्षाने स्पष्ट करावीशी वाटते, हे लिखाण नक्षलवाद चांगला कि वाईट या वादग्रस्त चर्चेला बाजूला ठेवून करत आहे.

                    दि. २० मार्च २०१४ च्या दै. लोकसत्ता मध्ये सरकार दरबारी नक्षलवाद या संकल्पनेला मोड देऊन कट्टर डावी विचारसरणी ग्रस्त अशी नवीन संकल्पना रूजविल्याची बातमी प्रसिद्ध झाली. ही गोष्ट भारतामध्ये समता, न्याय मिळविण्यासाठी व दलित, गरिब, शोषितांचे, तळागळातील समाजाचे प्रश्न मांडणाऱ्यासाठी धोक्याची घंटा आहे. मी पूर्वीपासून बोलत आलोय, सरकार नक्षलवादाचा उपयोग सामाजिक चळवळी दडपण्यासाठी करत आहे. मागे अदिवासी भागांमध्ये फिरून आल्यानंतर काही मित्रांशी चर्चा करताना मी या मुद्दयावर अधिक भर दिला होता.

                       नक्षलवादाचा उदय, त्यांची तत्व धोरणे, हिंसेचा मार्ग वा योग्य की अयोग्य या चर्चा बाजूला ठेऊ. प्रशासन नक्षलवादाचा वापर करून देशातील सामाजिक चळवळी संपविण्याचा जो प्रयत्न करतेय ते समाजासमोर येणं महत्त्वाचे आहे.

                 लोकशाही व न्यायव्यवस्था, शासनव्यवस्था यांच्यासाठी नक्षलवाद ही त्रयस्थ समस्या आहे. पण या समस्येचा उपयोग देशामध्ये समानता, न्याय प्रस्थापित करणाऱ्या चळवळी संपविण्यासाठी देशात आलेल्या प्रत्येक सरकारने केला व भविष्यात मोठ्या प्रमाणात होण्याचे संकेत प्रस्तुत बातमीच्या रूपाने आला. प्रश्नाच्या मुळाशी न जाता आहे त्या समस्येचा उपयोग आपल्या एकाधिकारशाहीवर व वर्चस्वावर गदा आणणाऱ्या चळवळीविरूद्ध करायचा प्रयत्न येथील प्रशासनाने सतत केला. ‘’डावी विचारसरणी ही एक राजकीय सामाजिक विचारसरणी आहे, जी समाजातील बहुसंख्य असा शोषित पिडीत लोकांच्या मुलभूत हक्कासंदर्भात सतत आवाज उठवत असते”, असे मानले जाते.

                     एक मुख्य संदर्भ येथे लक्षात घेणे गरजेचा आहे, देशातील अनेक डाव्या विचारसरणीच्या लोकांचा व चळवळींचा नक्षलवाद्यांच्या हिंसात्मक मार्गाला विरोध आहे. म्हणजे प्रत्येक डाव्या विचारसरणीचा माणूस नक्षलवादाचे समर्थन करतो असे नाही. त्यामुळे नक्षलवादा ऐवजी डावे हा शब्द वापरण्याच्या प्रशासनाच्या हेतुवर संशय घेण्यास भरपूर वाव आहे. समता प्रस्थापित करणाऱ्या, शोषितांच्या हक्कांसाठी लढा देणाऱ्या दलित चळवळी संपविण्यासाठी प्रशासनाला नक्षलवाद हे आयतेच अस्त्र मिळाले आहे. नक्षलवाद या संकल्पनेला डावलून त्याठिकाणी डावे ही संकल्पना रूजली की चळवळी मोडीत काढण्यासाठी जास्त वेळ घालायची गरज या असमानतानिष्ठ लोकांना पडणार नाही. 

                   ज्याप्रमाणे मुंबईतील कामगार चळवळी संपविण्यासाठी कांग्रेसने शिवसेना नावाचे पिल्लू सोडले व मुंबईतील कामगार व कामगार चळवळ संपविली त्याचप्रमाणे नक्षलवाद या संकल्पनेला बगल देऊन डावे ही संकल्पना वापरून येथील तत्वनिष्ठ व वैचारिक अधिष्ठान असलेला समतेचा लढा संपविण्याचा घाट या व्यवस्थेने घातल्याचे दिसून येत आहे. देशातील समानता मागणाऱ्या वर्गाला एकदा का नक्षलवादी म्हणून जाहीर केले किंवा त्या पठडीत नेऊन ठेवले की, स्वताला हवी असलेली समाजाची पिळवणूक, शोषण करून घेण्यास प्रस्थापित वर्गाला विशेष काही करण्याची गरज पडणार नाही.

                   असेच छूपे धोरण चाल् राहिले तर एक दिवस समानतेच्या लढयासाठी आपले आयुष्य वाहिलेल्या फुले, शाहू, आंबेडकर या समाजसुधारकांना देखील भविष्यात नक्षलवादी व प्रशासकीय भाषेत डावे म्हणूनच समोर आणण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जाऊ शकतो. हा प्रश्न फक्त दलित वा तळागळातील समाजाचा नसून प्रत्येक जातीधर्मातील शोषितांचा आहे. आज ही लाट फक्त विशिष्ट समाजापुरती जरा मर्यादित असली तरी भविष्यात याची झळ सर्वांनाच बसणार आहे हे मात्र नक्की. त्यामुळे भविष्यातील समानतेवर आधारित समाजाची स्वप्ने पाहणाऱ्यांनी ही स्वप्ने उध्दवस्त होण्या अगोदरच ही शोषणाविरूद्धचा विद्रोह संपविण्याच्या प्रयत्नांना हाणून पाडायला हवे................