दिल्लीत मराठी पताका उंचविणारे – महाराष्ट्र परिचय केंद्र
दिल्ली, देशाची राजधानी. राष्ट्रीय पातळीवरील घडामोडींचे
मध्यवर्ती केंन्द्र. विविधतेने नटलेल्या या देशात प्रत्येक राज्याची संस्कृती मग
ती पोशाख – आहार – विहार – सामाजिक असो. ती वेगळी आहे. देशातील 28 राज्यांच्या
संस्कृतीचे दर्शन दिल्लीत पहायला मिळते. दिल्ली हे विविध घडामोडींचे केंन्द्र
असल्याने तेथील प्रत्येक माहिती अधिकृतरित्या महाराष्ट्रातील माणसांपर्यंत पोहचणे
गरजेचे आहे. दिल्लीमध्ये मराठी माणसांची संख्या तशी भरपूर आहे. दिल्लीतील घडामोडींची
अधिकृत माहिती मिळण्याचे, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील संस्कृतीचे, साहित्याचे,
सामाजिक बदलांचे राजधानीत प्रतिनिधीत्व करणारे केंन्द्र म्हणजे महाराष्ट्र परिचय
केंन्द्र...
दिल्ली अभ्यास सहलीमध्ये राजधानीतील प्रख्यात मराठी पत्रकार
अनंत बागाईतकर यांना भेटण्याची संधी मिळाली. ही भेट महाराष्ट्र परिचय
केन्द्रामध्ये झाली. या निमित्ताने महाराष्ट्र परिचय केन्द्र पाहण्याची संधी
मिळाली. प्रशस्त असा केन्द्राच्या आफीस
मधील हाल मध्ये ही भेट होणार होती. हालमध्ये चारी बाजूला मराठी पुस्तकांचा खच दिसत
होता. टेबलवरील ठेवलेली महाराष्ट्रातील मराठी वर्तमानपत्रे दिल्लीत गेल्यानंतर
प्रथमच डोळ्यासमोर दिसत होती. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या भेटीने
महाराष्ट्राबाबत उत्साह निर्माण करण्याचे काम केलं.
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या दूरदृष्टीतून
या केंन्द्राची सुरूवात झाली. दिल्लीमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व व प्रतिबिंब
असावे, हा त्यामागचा उद्देश होता. आज 52 वर्षांनंतर या केन्द्रांने ध्येय
जोपासतानाच विविध उपक्रमांच्या माध्यमांतून दिल्लीतील मराठी माणसासाठी महाराष्ट्र
दिल्लीत उभा केला आहे. मराठी साहित्य आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजत असताना
महाराष्ट्रयीन दिल्लीकरांना त्यांच्या मातीच्या साहित्याशी नाळ अबाधित राखता यावी,
यासाठी दरवर्षी ग्रंथोत्सव भरविण्यात येतो. त्याच धर्तीवर चित्रपट महोत्सवाचे
देखील आयोजन करण्यात येते.
आज महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करणारे 73 खासदार दिल्लीत
आहेत. महाराष्ट्रातून दिल्लीत गेलेल्या मराठी माणसाला स्थिर होण्यास व खासदारांशी
समन्वय साधण्यासाठी येथून मदत मिळते. महाराष्ट्र शासनासाठी राजधानीतील
घडामोडींच्या अघिकृत माहितीचे केंन्द्र म्हणून याकडे पाहिले जाते.
उत्तराखंडमध्ये आपत्तीजनक परिस्थितीमध्ये अनेक
महाराष्ट्रीयन अडकले होते. मुंबईतून मदत पोहण्यास होणारा उशीर लक्षात घेता,
महाराष्ट्र परिचय केन्द्रांने या ठिकाणी महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व केले.
बचावलेल्या लोकांची राहण्याची व्यवस्था, त्यांना परत महाराष्ट्रात पाठविण्यासाठी
केन्द्रांतील कर्मचारी 24 तास करत होते. केन्द्रांचे उपसंचालक दयानंद कांबळे,
जनसंपर्क अधिकारी प्रविण डाके व उपसंपादक रितेश भोई यांनी आमच्याशी मुक्तसंवाद
साधला.
केन्द्रांतून बाहेर पडताना एवढेच वाटते, मराठी मामसाला
दिल्लीत गेल्यानंतर काहीही अडचण आली तर हक्काने मदत मागावी व त्याचप्रमाणे मदत
करणारे ठिकाण म्हणजे महाराष्ट्र परिचय केन्द्रं.विशेषत: पत्रकारांसाठी....
No comments:
Post a Comment