![]() |
| यावर्षीचा उत्कृष्ट वन्यजीव छायाचित्र पुरस्कार मिळालेलं ब्रेन्ट स्टिरटन यांनं काढलेलं छायाचित्र |
मागच्या दोन चार दिवसांपूर्वी यावर्षीचा उत्कृष्ट वन्यजीव छायाचित्र पुरस्कार जाहीर झाला. मानव आणि वन्यजीव यांच्यातील संघर्षाचं छायाचित्रण करणाऱ्या ब्रेन्ट स्टिरटन या न्यूयॉर्कस्थित छायाचित्रकाराला हा पुरस्कार मिळाला. पुरस्कार मिळाल्यामुळं त्यानं काढलेल्या छायाचित्रानं जगाला हादरवून टाकलं. वन्यप्राण्यांच्या तस्करीसंदर्भातलं हे छायाचित्र अफ्रिकेमधलं आहे.
दक्षिण अफ्रिकेतील ल्हूल्हूवे इम्फोल्झी पार्कमधील तस्करीचा बळी पडलेल्या एकशिंगी गेंडयाचं हे छायाचित्र आहे. सदर गेंड्याचं शिंग स्थानिक तस्करांनी काढून नेल्यानंतर ब्रेन्ट यांनं हे छायाचित्र काढलं होतं. हे स्थानिक तस्कर इतरांच्या आदेशावरून ही तस्करी करतात. ह्या गेडंयांचे शिंग चीन किंवा व्हिएतनाममध्ये स्म्गल केले जातात.
![]() |
| ब्रेन्ट स्टिरटन |
एकंदरित पुरस्कारच्या निमित्तानं का होईना पण वन्यप्राण्यांच्या तस्करीचा मुद्दा चर्चेत आला आहे. हा वन्यजीव पुरस्कार नॅचरल हिस्ट्री म्युझिअम यांच्या तर्फे दिला जातो.
ब्रेन्ट स्टिरटन याच्याविषयी...
ब्रेन्ट याची छायाचित्रं मानव आणि वन्यजीव यांच्यातील संघर्ष दाखविणारी असतात. ब्रेन्ट याचं काम यापूर्वी National Geographic, NewsWeek, CNNTraveller, The New York Times Magazine, the Washington Post Magazine, The Sunday Times Magazine इत्यादी ठिकाणी प्रकाशित झालं आहे.
![]() |
| ब्रेन्ट स्टिरटन याच्या गोरिला इन द काँगो स्टोरीतील छायाचित्र |
नुकत्याच त्याला मिळालेल्या या छायाचित्र पुरस्कारमुळं प्राण्यांच्या तस्करीविरोधात जागतिक पातळीवर ठोस पावलं उचलली गेली तर या छायाचित्राचं आणि छायाचित्रकाराच्या कामाचं सार्थक झालं असं म्हणता येईल.


