नुकतेच सलमान खान हे भारतीय 'देशभक्त' श्रीलंकेत महिंद्र राजपक्से यांच्या प्रचारासाठी सभा घेत फिरत आहेत. सध्या भारतातील एकंदरीत परिस्थितीत निवडणूकांमध्ये सभा घेणे हे एक करियरच झाले आहे. त्यात आमचे पंतप्रधान मा. मोदी यांनी २०१४ मध्ये प्रथम क्रमांक पटकविला आहे. मागील काही निवडणूकांमध्ये सिनेसृष्टीतील नट नट्यांनी राजकीय नेत्यांसाठी प्रचार सभा घेणे हे पैसे कमविण्याचे उत्तम साधनच बनले होते. निवडणूक काळात आम्हां भारतीयांना विचार न करण्याचा अनुवंशिक रोगच जडतो. मग आम्ही अगदी उदार मनाने या नट नट्यांच्या सभांना प्रचंड गर्दीने उपस्थित राहण्याच्या स्पर्धेत उतरत असतो आणि गर्दीही करतो. पण २०१४ या निवडणूकांच्या वर्षात मोदींमुळे किंवा मोदींनीच या कलाकारांच्या अभिनयाची दखल न घेता त्यांच्या पोटावर पाय ठेवला. कदाचित त्यामुळेच सातत्याने 'रक्षणाय' अशी पोलिसांची भूमिका साकारून देशभक्त असल्याचा भ्रम निर्माण करणाऱ्या सल्लूभाईंना पोटापाण्यासाठी किंवा राजपक्षे किंवा मैत्रींन जँकलीन फर्नांडीस हिच्या मैत्रीसाठी श्रीलंकेचीच वाट धरावी लागली.
भारतातील निवडणूकांमध्ये जर दुसऱ्या देशातील असे भुक्कड लोक प्रचारासाठी उतरले असते तर आमच्या 'राष्ट्र' संकल्पने भोवती पिळवटलेल्या आस्मिता जाग्या झाल्या असत्या. तेव्हा आम्हांला सार्वभौमत्वाची जाणिव राजकीय फायद्यासाठी का होईना झाली असती. कारण आम्ही ठरवलेलंच आहे ना की आमच्यामध्ये हस्तक्षेप केला की तो सार्वभौमत्वाला धोका आणि आम्ही दुसऱ्यांमध्ये केला की ते भारतीयांचे वैश्विकीकरण. पण श्रीलंकेमध्ये जाऊन सलमान खान नावाचा श्रीलंकेचे नागरिकत्व नसलेला भारतीय गृहस्थ स्थानिक कलाकारांचा विरोध असताना प्रचारामध्ये सहभागी होत असेल तर अस्मितेच्या बोंबा मारणाऱ्यांना भूमिका घ्यावीच लागेल. जशी भारतीय असल्याची अस्मिता आहे तशी श्रीलंकेतील लोकांना श्रीलंकन अस्मिता नसणार का? निवडणूका हा एकंदरित पूर्णपणे श्रीलंकन लोकांचा महत्त्वाचा अधिकार आहे. जो व्यक्ती तिथला नागरिक नाही त्याने तिथं जाऊन लोकांना भ्रमित करणं हे लोकशाही मुल्यांच्या व राष्ट्रीय मुल्यांच्या विरोधी आहे. लोकशाही वर विश्वास ठेवणाऱ्यांनी व सार्वभौमत्वाचा आदर असणाऱ्यां सर्वांकडून याबद्दल प्रतिक्रियेची अपेक्षा होती कारण लोकशाही मुल्य ही फक्त भारतापुरतीच मर्यादित नसतात तर त्यांचे वैश्विकीकरण गरजेचे आहे. पण याबद्दलच्या प्रतिक्रिया कोठेच उमटल्या नाहीत. फेसबुक आणि व्हॉट्सअँप वर रंगलेल्या आमच्या समवयस्क तरूणांकडून अपेक्षा होत्या पण डिजीटल सिम्बॉल मध्ये संवाद साधणाऱ्यांना स्वताच्या देशाबद्दल जाणिवा नाहीत त्यांच्याकडून दुसऱ्या देशाच्या राष्ट्रीय मुल्य जपण्याची व त्यावर भाष्य करण्याची अपेक्षा करणे फसवीच वाटते.
त्यामुळे भारतातून सुद्धा सलमान खानच्या एकंदरित या अर्थिक कार्यक्रमाला विरोध करणे गरजेचे आहे. सार्वभौमत्वाच्या गप्पा मारणाऱ्यांची जर आज काहीच भूमिका नसेल तर निवडणूकांमध्ये चीन व रशिया कश्याप्रकारे भारतातील कम्युनिस्टांना मदत करते किंवा अमेरिका कशी इथल्या भाजपला व कॉग्रेसला मदत करते या बद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार राहणार नाही. दुसऱ्यांच्या अस्मितांचा आदर केला किंवा ती दुखावणाऱ्याला विरोध केला तरच आमची अस्मिता आमचं सार्वभौमत्व टिकून राहिल. वाच्यता न करणं वा विरोधी प्रतिक्रिया न देणं याचाच अर्थ समर्थन दर्शविणे असाही घेता येऊ शकतो. अन्यथा उद्या भारतातील निवडणूकांमध्ये परदेशी कलावंत सहभागी झाल्यास विरोध करण्याचे कारण नाही.

लेखकाचे इतर वाचण्यासाठी क्लिक करा
http://movementswatch.blogspot.in/
http://awhanabhi.blogspot.in/
http://awhanabhi.blogspot.in/